अभंग प्रकाशन
“आशय, विषय, कृती आणि व्यवहार सर्वकाही अभंग…”
अभंग
About –
अभंग हा शब्द ऐकला की आपल्याला आठवतात ते तुकोबा. परंतु अभंग हे केवळ संत तुकारामांनी रचलेलं पद्य नव्हे तर अभंग हे जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. अभंग या शब्दात अद्वैताचं अध्यात्म आहे. अभंग हे प्रबोधन आहे, अभंग हा संत साहित्याचा गाभा आहे. अभंगातले विचार हे मध्ययुगाचे विज्ञान आहे. या शब्दाचा अर्थच मुळात ‘जे भंग पावत नाही ते’ असा होतो. अभंग म्हणजे अशी स्थिती जिथे सारे भेद संपतात, एकसंधता भरून राहते आणि आनंदाला अंत नसतो. या शाश्वत आनंदाची अनुभूती ‘अभंग प्रकाशन’ आशयातून आपल्या वाचकांना सतत देत राहील हीच शाश्वती..
उद्दिष्ट –
Mission –
भारत देशाला साहित्याची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा लाभली आहे. भारतीय साहित्य जगताने जागतिक साहित्यात आपले महत्वपूर्ण योगदान सतत अधोरेखित केले आहे. यात दर्जेदार प्रकाशन संस्थांची भूमिका मोलाची ठरलेली आहे. हा समृद्ध वारसा पाहता आम्ही “अभंग प्रकाशन”च्या माध्यमातून या परंपरेत आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे येऊ पाहत आहोत. आम्ही वाचकांसाठी विवेकपूर्ण आणि दर्जेदार साहित्यकृतीची मेजवानी घेऊन येत आहोत.
वाचकांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कृषी, विज्ञान, धार्मिक, अध्यात्मिक, काव्य, वाङ्मय इत्यादी क्षेत्रातील दर्जेदार ग्रंथ, नियतकालिके तसेच शोधनिबंध उपलब्ध करून देणे आमचे उद्दिष्टे आहे.
अभंग प्रकाशन हे वाचकांच्या पसंतीस उतरणाऱ्या आणि सामाजिक आरोग्यास पुरक ठरणाऱ्या साहित्य निर्मितीसाठी आणि त्याच्या प्रचार-प्रसारासाठी सदैव कटिबध्द राहील.
ध्येय
Vision –
विवेकी आणि विधायक आशयाने संपन्न साहित्यकृती ही काळाला संस्कारक्षम बनवत असते. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या सार्वत्रिक मानवतावादी मूल्यांशी निष्ठा बाळगत सामाजिक उन्नयन साधणाऱ्या आशयाची निर्मिती हे अभंग प्रकाशनाचे ध्येय आहे.